जालना तालुका

केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्यातर्फे जालना तालुक्यातील भजनी मंडळींना सुरपेटी वाटप:

जालना/तुकाराम राठोड

images (60)
images (60)

प्रभू श्रीराम मंदिर निकालानंतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होणार असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता.या निकालानंतर केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या सुचनेनुसार जालना तालुक्यातील दहिफळ गावातील भजनी मंडळांनी दिंडी काढून,भजन-किर्तन व पाउले खेळून उत्सव साजरा केला होता.आध्यात्मिक विचारांच्या जडण-घडणीमध्ये गावातील भजनास असणारे अनन्य साधारण महत्व लक्षात घेता,सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी या आनंद उत्सवात प्रभू श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जालना तालुक्यातील दहिफळ गावातील भजनी मंडळास केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या वतीने प्रत्येक गावासाठी व भजन-किर्तनासाठी हार्मोनियम (सुरपेटी) सप्रेम भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.दि.१२/०६/२०२१ शनिवार रोजी, भाजपा जिल्हा कार्यालय जालना येथे सुरपेटी चे वितरण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष-मा.भास्कर दानवे व मा.गोवर्धन कोल्हे(स्वीय सहाय्यक)यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भास्कर दानवे म्हणाले की,आधुनिक जगात वावरत असताना,भौतिक प्रगती करत असताना,अध्यात्माची साथ असायला हवी.अध्यात्मातून भौतिक प्रगती साधली तर ती प्रगती निरंतर राहते,आध्यात्मिक विकास साधण्यासाठी भजन हे प्रभावी माध्यम आहे.म्हणून भजनी मंडळांचा विकास व्हायला हवा.जालना तालुक्यामधील ७५ गावातील भजनी मंडळींनी आनंद उत्सव साजर करून भूमिपूजन सोहळ्यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या वतीने हार्मोनियम (सुरपेटी) सप्रेम भेट दिली आहे.असे भास्कर दानवे यांनी सांगितले.यावेळी दौलत भुतेकर,शंकर काळे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!