शेतक-यांनी केली शेतात खरिप पेरणीला सुरुवात
तुकाराम राठोड/प्रतिनीधी
आज दिनांक.24/06/2021,गुरूवारी जालना तालुक्यात बर्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतात खरिप पेरणीला सुरुवात करण्यात आली.शेतकरी संताराम पवार यांनी बैलांच्या साह्याने पेरणी केली.त्यांनी शेतामध्ये सोयाबीन,उडीद,मुग,तुर,भुईमूग व इतर काही खरिप हंगामातील पीके पेरणी केली आहे.कोणी बैलांच्या साह्याने तर कुणी ट ट्रॅक्टरच्या सह्यांने पेरणी करत आहेत.महत्त्वाचे म्हणजे लहान मुले व मुली शाळा बंद असल्याने आई-वडिलांना शेती कामात मदत करत आहे.
मागिल आठ ते दहा दिवसापासून वरुन राज्यांने पाठ फिरवल्यांने शेतकरी चिंतेत होता.मात्र काल झालेल्या रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली.तर काही ठिकाणी शेतकरी मात्र बियाणे मिळत नसल्याने,जे आहे ते बियाणे वाया जाण्याच्या भीतीने पावसाची वाट पाहत आहे.काही ठिकाणी असे दिसून येते की कृषी सेवा केंद्र चालकाने बियाणांची केलेली भाववाढ यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.तरी पेरणीमुळे नाईलाजास्तव जास्त भावाने बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहे.
वारंवार जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले.मात्र याकडे असे दिसते की कृषी सेवा केंद्र चालक व कृषी अधीक्षक यांची मिली भगत आहे की काय असा प्रश्न काही शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.तरी याकडे शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.अशी मागणी शेतकरयांकडुन होत आहे.