जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने “स्कुल ऍट होम” पथदर्शी उपक्रम : महिको कंपनीचेही मोलाचे सहकार्य.

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर.
घनसावंगी तालुक्यासह गुंज बु येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जालना एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने स्कुल ऍट होम या पथदर्शी उपक्रमांतर्गत स्वाध्याय पुस्तिका चे वितरण करण्यात आले.
यावेळी गतवर्षी १७ शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला होता तर त्यावेळी ५०० पुस्तिका तर या वर्षी १६००पुस्तिका व शब्दकोश तालुक्यातील विद्यार्थ्यांना जालना एज्युकेशन फाऊंडेशने मोफत दिले.या संस्थेच्या माध्यमातून पढो जालना,शैक्षणिक पालकत्व दत्तक योजना, इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा, देवगिरी विद्यार्थी विकास प्रकल्प, मोफत शिकवणी वर्ग/ऑनलाईन क्लासेस,स्कुल ऍट होम असे विविध उपक्रम घेतले जातात.
यावेळी जालना एज्युकेशन फाउंडेशनचे प्रा सुरेश लाहोटी, सुनील रायठठा ,आणि महिको कपंनीच्या सहकार्याने ही पुस्तके वाटप केले जात असून हे दुसरे वर्ष आहे.
यावेळी गुंज बु. येथिल शाळेत पुस्तके वितरण करतेवेळी शाळेय समिती अध्यक्ष बालासाहेब भोसले,शिक्षणातज्ञ वसंतराव तौर,मुख्याध्यापक डी व्ही मोरे, ए व्ही गोतावळे, आर एस सिरसाट, दि एन शिंदे,एस एस काटे, इ आर देव,दि टी सुरणार, एस एस बहिर, के एम खांडेकर, बी पी नारवटे,इ पी जागेवाड व विद्यार्थी उपस्थित होते.