घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
जांबसमर्थ परीसरात विजेचा लपंडाव, ग्रामस्थांची गैरसोय!
वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
कुलदीप पवार / प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थसह परीसरात हलकाशा पाऊस व वाऱ्याने विजपुरवठा वारंवार खंडीत होत असून ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. कुंभार पिंपळगाव येथील महावितरणने मान्सूनपूर्वे कामे करूनही वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.