देशविदेश

घनसावंगी तालुक्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

उसने दिलेले दहा हजार रुपये परत मागितलयाचा राग आल्याने तीन जणांना लोखंडी सळी, गज, काठी व दगडांनी मारहाण करण्यात आली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

जालना न्यूज –

उसने दिलेले दहा हजार रुपये परत मागितलयाचा राग आल्याने तीन जणांना लोखंडी सळी, गज, काठी व दगडांनी मारहाण करण्यात आली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथे ही घडली. याप्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील कैलास संजय खरात याने गावातीलच गजानन आप्पासाहेब खरात याला काही दिवसांपूर्वी दहा हजार रुपये उसने दिले होते. गुरुवारी संध्याकाळी गजानन गावातील मारुती मंदिराच्या चौकात उभा असताना त्याला कैलास याने दिलेले उसने पैसे मागितले. यावेळी दोघांत बाचाबाची झाली. काही ग्रामस्थानी दोघांचे भांडण सोडवून दोघांनाही घरी सोडले होते. गजानन खरात याने त्याचे दोन भाऊ किरण व आण्णासाहेब यांना सोबत घेऊन कैलास याच्या घरी आला. तेथे कैलासवर लोखंडी सळी, लोखंडी गज, काठ्या व दगडांनी हल्ला
केला. त्यानंतर किशोर काकासाहेब खरात व दिलीप खरात यांनाही मारहाण केली. जखमींना तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कैलास खरात घटनेची तक्रार देण्यासाठी गोंदी पोलीस ठाण्यात गेला होता. तक्रार देऊन परतत येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. किशोर खरात याच्या बरगडीजवळ सळी मारल्याने जखम झाली होती.असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मयत कैलास खरात याचा भाऊ विशाल खरात याने गोंदी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गजानन खरात,आबासाहेब खरात, किरण खरात यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भांदवी ३०४,३०७,३२४,३२३,५०४,३४,१८८
कलमान्वये दाखल करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.पी.खोपडे यांनी दिली असुन गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या कडे देण्यात आला असुन तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी शुक्रवारी पहाटे मंगरूळ येथे जाऊन आरोपी गजानन खरात, किरण खरात, आण्णासाहेब खरात या तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी मृत कैलास खरात याचा भाऊ विशाल संजय खरात यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गजानन आप्पासाहेब खरात, किरण आप्पासाहेब खरात,आण्णासाहेब आप्पासाहेब खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे करत आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक