घनसावंगी तालुका

भर पहाटेची घटना : दोन महिन्यापूर्वी घेतलेला नवीन ट्रॅक्टरच गेला चोरीला

शिवनगाव ता घनसावंगी जि जालना गट क्र.१८६ कुंभार पिंपळगाव रोडवरील शेतात गोठ्यात उभा असलेल्या ठिकाणावरून चोरी गेलेला ट्रॅक्टर..

घनसावंगी प्रतिनिधी : नितिन राजे तौर

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील शरद उत्तमराव तौर यांच्या गट क्र.१८६ या शेतातील गोठ्यात उभा असलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतात कष्ट करून दोन पैसे जमवले आणि शेतीला जोडधंदा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची फाईल करून दोन महिन्यांपूर्वी महिंद्रा(अर्जुन)कंपनीचा नवीन ट्रॅक्टर घेतला मात्र चोरट्यांनी डाव साधला आणि बुधवारी भर पहाटेच्या सुमारास शेतातील गोठ्यात उभा असलेला ट्रॅक्टर लंपास केला शोधाशोध करून खुप प्रयत्न केले मात्र जवळपास कुठेही धागा दोरा लागेना म्हणून पोलिसांत तक्रार दिली आहे मात्र गोदाकाठ परिसरात ही चोरीची दुसरी घटना असुन पहिली घटना मागील आठवड्यात भादली येथील प्रल्हाद नाईकनवरे यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ऐवज लंपास केला होता यामुळे गोदाकाठ परिसरात भीतीदायक वातावरण पसरले आहे सध्या पावसाळा चालू असल्याने अनेक शेतकरी शेतात गुरे-ढोरे बांधून गावाकडे येतात मात्र रात्रीच्या सुमारास अशा घटना जर घडायला लागल्या तर काय होणार असा सवाल निर्माण होत आहे.
याबाबत शरद तौर यांनी सविस्तर तक्रार घनसावंगी पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पो हे कॉ बी बी हरिशचंद्र हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!