जालन्यात कनिष्ठ अभियंतास १९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
जालना : जालना तालुक्यातील भिलपुरी गावाला खासदार निधीतून दहा लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे .जिल्हा परिषद अंतर्गत गावठाण रस्ता व स्मशानभूमी बांधकामासाठी हा निधी मिळाला आहे. या कामाचे कंत्राट काशिनाथ चव्हाण आणि त्यांच्या मित्रांनी घेतले होते. त्यानुसार अर्धे काम झाल्यावर मोजमाप पुस्तिके नुसार ग्रामपंचायत च्या खात्यामध्ये चार लाख 73 हजार रुपये जमा झाले आणि धनादेशाच्या बदल्यात तीन टक्के रक्कम म्हणजे पंधरा हजार रुपये आणि या कामाचे ऑडिट करण्यासाठी चार हजार रुपये असे एकूण 19 हजार रुपये पंचायत समितीचे शाखा अभियंता देविदास भिकाजी ठोके पाटील 56 ,राहणार कांचन नगर जालना आणि कंत्राटदार काशिनाथ चव्हाण राहणार काकडा, या दोघांनी तक्रारदाराला देण्यासाठी मंठा चौफुलीजवळील d-mart येथे बोलावल. परंतु तक्रारदाराची लाच घेण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क केला आणि आज दिनांक 30 रोजी शाखा अभियंता देविदास भिकाजी ठोके पाटील आणि कंत्राटदार काशिनाथ चव्हाण या दोघांना लाच देण्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले तालुका जालना पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.