जालना लॉयन्स क्लबतर्फे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
दर्द : कहीं भी हो, रोती हैं आँखे, शरीर के किस कदर हमदर्द हे आँखे……..
जालना, दि. ५(प्रतिनिधी)-जालना लायन्स क्लबच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर स्थायी प्रकल्प अंतर्गत येत्या रविवार ८ ऑगस्ट रोजी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सकाळी ८ ते ४ या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.त्यात मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथा रविवारी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये हे शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा लॉ.मिनाक्षी दाड यांनी दिली.यासंदर्भात अधिक माहिती देताना लॉ. मिनाक्षी दाड यांनी सांगितले की,जनतेचे अंधत्व दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून लायन्स क्लबच्यावतीने विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येऊन मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर औरंगाबाद येथील लॉयन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. कोविड परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यापासून स्थगित करण्यात आलेला हा उपक्रम १८ जुलैपासून पुर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार ८ ऑगस्ट रोजी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत लायन्स आय हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. त्यात मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात येणार आहे.शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबच्या अध्यक्षा लॉ. मिनाक्षी दाड,सचिव लॉ. जयश्री लड्डा, कोषाध्यक्ष लॉ. प्रेमलता लोया,प्रकल्पप्रमुख लॉ.डॉ. गिरीश पाकणीकर, लॉ. अतुल लड्डा, लॉ. अरुण मित्तल, लॉ. शामसुंदर लॉया,लॉ. विजयकुमार दाड, लॉ. सतीश पित्ती यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य परिश्रम घेत आहेत. या शिबिराचा जिल्ह्यातील गरजू नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी प्रकल्पप्रमुख विजयकुमार दाड यांच्या (८४२१६९९६६०) या मोबाईल
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्षा लॉ. मिनाक्षी दाड आणि लायन्स क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.