Breaking News
जालना जिल्हा

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन्ही महिलांचे अहवाल आले निगेटिव्ह


जालनान्यूज :-
जिल्हा सरकारी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेल्या दोन्ही महिलांचे प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जालना शहरातील दुःखी नगर मधील एका 65 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली असून त्यानंतर मागील चार दिवसांपूर्वी शिरोडा ता.परतूर येथील एक 39 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवालानंतर स्पष्ट झाले होते. दुःखी नगर मधील महिलेचे प्रथम तीन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर चौथा अहवाल मात्र निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात होते. मात्र त्यानंतर प्रयोग शाळेकडून दुःखी नगर भागातील याच महिलेचा अहवाल तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे सरकारी यंत्रणेसमोरील चिंतेत वाढ झाली होती.काल शुक्रवारी रात्री उशिरा या महिलेसह शिरोडा ता.परतूर येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याचे या सूत्रांनी सांगितले आहे. मात्र या दोन्ही पॉझिटिव्ह असलेल्या महिला रुग्णाच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे आज शनिवारी सकाळी पुन्हा प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सलगपणे दोन अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतरच सदर पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे घोषित करण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आता प्रयोग शाळेकडून या दोन्हीही कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचे लाळेचे अहवाल काय येतात याकडे सरकारी यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यासह जिल्हा वासीयांचे लक्ष लागून आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक