जालना तालुका

माळशेंद्रा येेथे शंभर टक्के कोवीड लसीकरण
कोरोनामुक्त गाव मोहिमेला ग्रामस्थांचे सहकार्य

न्यूज, जालना.
तालुक्यातील माळशेंद्रा येथे शनिवारी (दि.२१) जिल्हा परिषद शाळेत कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील तिसरे लसीकरण शिबीर घेण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढाकारातून पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कोवीड लस टोचून घेतली. त्यामुळे गावातील १८ वर्षांवरील नागरिकांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

माळशेंद्रा ग्रामपंचायतीने सुरुवातीपासूनच कोरोना संसर्गापासून ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे याकरिता गावातील नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती, निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, मास्क वाटप व अन्य प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यावर भर दिला आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी ग्रामस्थांसाठी आयोजित लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आज गावात १८ वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी तिसरे कोवीड लसीकरण शिबीर घेण्यात आले. प्रारंभी सरपंच आनंद म्हस्के, उपसरपंच बालासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काशीनाथ जाधव, नारायण जाधव, रामेश्वर जाधव, शिवाजी साहेबराव जाधव, गंगाधर जाधव, माऊली जाधव, कृष्णा जाधव, राजू म्हस्के, संजय म्हस्के, भानुदास लहाने, कृष्णा लहाने, समाधान लहाने, सुनील लोखंडे, पीरपिंपळगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कबीर बेग, ग्रामसेवक श्री. शेळके यांच्या उपस्थिती शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कोवीड लस टोचून घेतली. १८ ते त्यावरील वयोगटातील १६० नागरिकांनी शिबिरात लस टोचून घेतली. शिबिरासाठी आरोग्य कर्मचारी के. के.बोर्डे, एम. आर. बदर, के.टी. हरकळ, बी. के. जाधव, श्रीमती डांगे, श्रीमती एस. के. कोल्हे, श्रीमती भरणे, शिक्षक श्री. ढेंगाणे, श्री. सोनवण आदींनी शिबिरासाठी सहाकार्य केले.

गावात लसीकरण

images (60)
images (60)

माळशेंद्रा गावात सध्या एकही कोरोना रुग्ण नसून गाव कोरोनामुक्त आहे. असे असेल तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांना गावातच विलगीकरणात ठेऊन उपचार करता यावे याकरिता विलगीकरण कक्षासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच आनंद म्हस्के, उपसरपंच बालसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काशीनाथ जाधव व नारायण जाधव यांनी दिली.

माळशेंद्रा जिल्हा परिषद शाळेत कोवीड लसीकरण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थिती ग्रामपंचायत पदाधिकारी.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!