जालना तालुका
भास्कर पोहेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
रामनगर/प्रतिनिधी
कोवीड काळात ऑनलाईन शिक्षणाद्वारे मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देता ज्ञानदानाचे कार्य केले तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत रामनगर येथील प्राथमिक शाळेतील सहशिक्षक भास्कर अण्णा पोहेकर (रा. टाकरवन ता. जि. जालना) यांना भाईश्री फाउंडेशनच्यावतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे पोहेकर यांना जाहिर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.