गुंज बु. येथे आयोजित श्री शिव महापुराण कथेची सांगता
कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव
घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. येथे आयोजित केलेला श्रावणमास महोत्सव श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता शनिवारी करण्यात आली.
गुंज येथे श्रावण मासामध्ये झालेल्या श्री शिव महापुराण कथे मधे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. गुंज नगरीमध्ये कितीतरी वर्षे पालटल्या यानंतर या वर्षी श्रावण मास मध्ये प्रथमता श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच कथाकार श्री ह. भ. प. प्रभाकर महाराज गरुड यांनी स्पष्टपणे ही कथा श्रोत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी या कथेची सांगता शिवकिर्तनकार श्री शि भ प सोनू महाराज साखरे यांच्या प्रसादाच्या कीर्तनाने झाली. यात त्यांनी आष्टी (धो जो) येथील संत श्री लक्ष्मण महाराज यांच्या अभंगावर कीर्तन केले. तसेच त्यांनी श्री संत लक्ष्मण महाराज व श्री सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी यांचे जीवनचरित्र सांगून आईचे महत्व ग्रामस्थांना सांगितले.
या कीर्तनासाठी साथ म्हणून गुंज नगरीतील प्रसिद्ध गायक आकाश खाडे, मृदंगाचार्य योगेश्वर तौर, तसेच टाळ वादक व गावातील भजनी मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गुंजच नव्हे तर इतर शेजारील गावातील शेकडो आदी भागातील भाविकांनी गर्दी केली होती. हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काशिनाथ घुंगासे, ओंकार दुकानदार, कैलास कदम, प्रकाश बोटके व आदी गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.