कोरोनाला हरविण्यासाठी तरुणांनी सक्रीय व्हावे – अक्षय गोरंट्याल
मौजपुरी येथे लवकरच व्यायाम शाळा सुरु करणार
जालना (प्रतिनिधी) ः तरुणा हा या देशाचा आधार आहेश सुदृढ युवकच देशाला तरणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या येणार्या तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी तरुणांची सक्रीय व्हावे, कोरोनाच्या विरोधात लढ देण्यासाठी प्रत्येकांनी सॅनिटायझर आणि मास्कचा नियमीत वापर करावा आवाहन युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी केले.
मौजपुरी येथे अक्षय गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभीक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भागवत राऊत यांची तर प्रमुख पाहुने म्हणून रमेश यज्ञेकर, रामनगरचे सरपंच सोपान शेजुळ, गुंडेवाडी येथील सरपंच मनोहर पोटे, अरुण घडलींग, सागर ढक्का, दहिफळचे सरपंच युवराज राठोड, भगवान नाईकनवरे, शत्रुघन मगर, विजु खंदारे, बालाजी पैलवान, मनोहर पैलवान यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना अक्षय गोरंट्याल म्हणाले की, देशातील तरुणांना सुदृढ आणि सक्षम बनवायचे असेल तर त्यांना निरोगी रहावे लागेल. तरुणांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून देशाला कोरोनापासून वाचवायचे आहे. शिवाय सुदृढ युकव घडविण्यासाठी मौजपुरी येथे लवकरच व्यायामशाळा सुरु केली जाईल आणि पुढील कार्यक्रम हा त्याच व्यायामशाळेत होईल असे आश्वासन अक्षय गोरंट्याल यांनी दिले. वृक्षारोपन, रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम समाजासाठी उपयुक्त ठरतील. तरुणांनी स्वतः जागृत आणि सजग राहुन मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन स्वतःची, परीवाराची आणि समाजाची काळजी घ्यावी असेही अक्षय गोरंट्याल यांनी म्हटले.
यावेळी सरपंच ज्योतीताई राऊत भागवत, राऊत बद्रीनारायन भसांडे, सत्यनारायण ढोकळे, राम जाधव, संतोष मोरे, नारायण गायकवाड, बंडू काळे, बंडूभाऊ डोंगरे, बालाजी बळप, अच्युत मोरे, माऊली राऊत, अंकुश काळे, सागर ढक्का, अरुण बबन शामगिर, युराज राठोड, घडलिंग बाळू, सोपान शेजुल, गायकवाड राजू महाडिक, भगवान नाईकनवरे, सुधाकर ढोकळे, नारायण डोंगरे, मनोहर राऊत, अनिल काळे, राम शेजुळ, विष्णू गायकवाड, कृष्णा शेजुळ, सुनील मोरे, कृष्णा हिवाळे, बबन राऊत यांची उपस्थिती होती.