जालना तालुका

जालना मंठा रोडवर उभ्या कंटेनरला स्विप्टची धडक;एक जागीच ठार.

बबनराव वाघ,उपसंपादक

जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव पाटिवर रोडच्या कडेला उभा असलेल्या कंटनेरला स्विप्ट गाडीने जोरदार धडक दिल्याने एक जन जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. या मध्ये परतुर तालुक्यातील शेवगा येथील विकास श्रीरंग धूमाळे हे जागीच ठार झाले आहे तर सतीश वायाळ हे गंभीर जखमी झाले आहे.
या बाबद अधिक माहीती अशी कि,
१३तारखेला भोपाल येथून आध्राकडे जाण्यासाठी निघालेला कंटनेर मंगळवारी सकाळी जालना मंठा रोडवरून परभनीकडे जाणारा कंटनेर HR 55 M 5754 हा देखभाल साठी पिरकल्यान पाटिवर रोडच्या कडेला उभा होता.त्याच वेळेस जालन्याकडून मंठ्याकडे जाणार स्विप्ट MH02 CR 1565ही जोरदार वेगाने उभ्या कंटनेर वर धडकली . स्विपटचा वेग हा मोठा असल्याने धडक झाल्यानंतर गाडी पुन्हा जालन्याकडे तोंड करून उभी राहीली होती. स्विप्ट गाडी मध्ये दोघे जण होते. ड्राईवर च्या बाजूला बसलेले श्रीरंग धूमाळ हे जागीच ठार झाले.तर सतीश वायाळ हे गंभीर जखमी झाले आहेत.या भयानक अपघातामध्ये स्विप्ट गाडीचा चूराडा झाला आहे.
मंगळवारी सकाळी हा अपघात झाल्याने मोठ्या प्रमानात आवाज आल्याने सिंधी काळेगावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमानात मदतीसाठी धावले. अपघातानतंर ग्रामस्थानी जखमींना बाहेर काढून पोलिस प्रशाषनाला माहीती दिली.या मध्ये सिंधी काळेगाव येथील पुर्षोत्तम गिराम , सय्यद मुनशी, परसराम गिराम, सकाराम मगर ,डिगाबरं लकडे,जाखीर सय्यद,सह ग्रामस्थ हजर होते.तसेच महामार्ग पोलिस पथकाचे पोलीस काँन्सटेबल बी. बी.गायकवाड राठोड,गोरखनाथ दिघोळे,अशोक कांबळे,हे घटनास्थळी आले होते

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!