घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
श्रीक्षेत्र मुर्ती ते कपिलधार पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र मुर्ती ते कपिलधार पदयात्रेत (दि.१४) रविवार पासुन प्रारंभ होत आहे.बीड जिल्ह्यातील श्री कपिलधार येथे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणासह विविध राज्यातून लाखो भाविक पदयात्रा घेवून येतात.त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र मुर्ती ६ वर्षापासून जालना जिल्ह्यातील मुर्ती येथून पदयात्रा काढण्यात येते.रविवारी या पदयात्रेस प्रारंभ होत आहे. ही पदयात्रा टाकरवण,नाथापुर,म्हाळस जवळा,भगवान बाबा देवस्थान मुक्काम,मार्गे कपिलधार येथे १८ नोव्हेंबर रोजी दाखल होईल.तर दि. १९ रोजी तुळसीराम गुणाजीआप्पा वागदरे यांचा वतीने महाप्रसाद होणार आहे.या पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन दिंडी आयोजक श्री.वे.मु.शिवकथाकार विरभद्र स्वामी कुंभार पिंपळगाव यांनी केले आहे.