जालना तालुका

जालना:कोव्हीड हेल्थ सेंटरसह कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : पालकमंत्री टोपे

 

images (60)
images (60)

 जालना दि. 10 (न्युज जालना) :- संपुर्ण राज्यात कोव्हीड19 बाधितांची संख्या वाढत असुन जालना जिल्ह्यातही बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन कोव्हीड19 चा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा  सज्ज ठेवण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

  जालना जिल्ह्यात आजघडीला 161 एवढे रुग्ण सक्रिय असले तरी कोव्हीड19 चा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील कोव्हीड19 हॉस्पीटलसह सर्व डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमधील  यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावी.  जिल्ह्यातील कोव्हीड19 रुग्णालयासह ईतर खासगी डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयात  ऑक्सिजन सुविधा असलेले 591 बेड असुन ऑक्सिजन सुविधा नसलेले 132 तर आयसीयु सुविधा असलेले 232 असे एकुण 955 बेड आहेत.  8 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असुन 947 बेड उपलब्ध आहेत.  जिल्ह्यातील खासगी व शासकीय  डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये  1 हजार 849 बेड असुन  ऑक्सिजन सुविधा असलेले 1 हजार 297, ऑक्सिजन सुविधा नसलेले 322 तर आयसीयु सुविधा असलेले 230 बेड आहेत.    तसेच जिल्ह्यात असलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये 1 हजार 856 बेड असुन येथे 4 रुग्ण उपचार घेत आहेत तर 1 हजार 852 बेड उपलब्ध आहेत.  

                जिल्ह्यातील डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरसह कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देत जे कोव्हीड केअर सेंटर बंद करण्यात आली असतील ती तातडीने सुरु करण्यात यावीत.  या ठिकाणी नियमित स्वच्छता ठेवण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात औषधी व मनुष्यबळ उपलब्ध राहील याचीही दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

                जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्याच्या सूचना करत लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात येऊन चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करत जिल्ह्यात लसीकरणालाही अधिक गती देण्याचे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.  

                जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, कोव्हीड19 बाबत असलेल्या शंका, लसीकरणाची माहिती, रुग्णवाहिका आदी असलेली माहिती क्षणात मिळावी यासाठी कॉलसेंटर तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.  तसेच गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना आरोग्य प्रशासनामार्फत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तसेच आरोग्यविषयक मदतीसाठी हेल्पलाईन आजपासुन सुरु करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!