जालना जिल्हा

सातारा जिल्ह्यातील खंडाळ्याला सापडले सहाय्यक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे

जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

जालना शहरातून बेपत्ता झालेले सहाय्यक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे गेल्या १३ दिवसापासुन घरातुन बेपत्ता झाले होते. ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील महामार्गावरील जुना टोलनाका या परिसरात आढळून आले आहेत. त्यांना एका खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आल्याची माहीती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली.

संग्राम ताटे हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील महामार्गावरील जुना टोलनाका येथे दोन दिवसापासुन एकाच ठिकाणी राहुन कसेबसे जेवण करुन राहत होते. याबाबत काही जणांनी खंडाळा पोलीसांना माहीती दिली. यावेळी खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या सुचनेनुसार पीएसआय पांगारे, पोलीस पिसाळ यांनी अधिक तपास करता हे बेपत्ता असलेले ताटे असल्याचे निष्पन्न झाले. खुप दिवस जेवणाची हडबड पाहता, त्यांना खुपच आशक्तपणा जाणवत असल्याने,त्यांना शिरवळ,येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान जालना येथुनत तपास आधिकारी पोलीस महेश टाक यांना याबाबत सर्व माहिती देऊन बोलविण्यात आले असल्याचे खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!