जालना जिल्हा

कॉग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणी; पक्ष कोणी संपवू शकणार नाही-अ‍ॅड.मोघे


जालना (प्रतिनिधी) ः काँगे्रस पक्षाला काही पक्ष संपविण्यासाठी निघालेले आहेत. परंतू काँगे्रस ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी असून तळा गाळातील लोकांचा पक्ष आहे. अखिल भारतीय काँगे्रस कमिटीच्या वतीने डिजीटल सदस्य नोंदणी मोहीमेमध्ये जालना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग नोंदवून सर्वात जास्त नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले आहे.

images (60)
images (60)


जालना जिल्हा आणि शहर काँगे्रस कमिटीच्या वतीने कॉग्रेस पक्ष डिजीटल सदस्य नोंदणी मोहीमेचा आढावा घेण्यासाठी शनिवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जुना जालना येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. मोघे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंडे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब खंदारे, ज्ञानेश्‍वर भांदर्गे, शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, अंकुश शेठ राऊत, आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. मोघे म्हणाले की, कॉगे्रस पक्ष हा कधीही न संपणारी विचारसरणी आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत काँगे्रस पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवून राज्यामध्ये क्रमांक एक चा पक्ष राहणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटनात्मक बांधणी उभी करावी. आ. गोरंट्याल यावेळी बोलतांना म्हणाले की, जालना नगर परिषदमध्ये कॉगे्रस पक्ष एक हाती सत्ता हस्तगत करेल, यात तीळमात्र शंका नाही. शासनाने या निवडणूका ओबीसी आरक्षणासाठी लाबविलेल्या आहेत. ही ओबीसीसाठी न्यायाची बाजू असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा परिषदमध्येही काँगे्रस पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगीतले. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता त्यांच्या विरूध्द टिकास्त्र सोडतांना म्हणाले की, कोणता निधी कोठून येतो केंद्राकडून का राज्याकडून याची ज्यांना माहिती नाही त्यांनी विकासाच्या कामा संदर्भात वायफळ बोलू नये. जालना शहरामध्ये येत्या 10 दिवसामध्ये विशेष कार्यक्रम राबवून 10 हजार पेक्षा जास्त कॉगे्रस पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात येईल.

असे त्यांनी यावेळी सांगीतले. जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की, जालना जिल्ह्यात पक्ष नोंदणीसाठी येत्या काळात व्यापक मोहीम राबवून जिल्हातून 20 हजार सदस्य नोंदण्याचा पक्षाचा मानस आहे. यासाठी प्रदेश कॉगे्रसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी रामकिसन ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नोंदणीचा संकल्प पुर्ण करू यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. यावेळी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे यांनी आपल्या भाषणातून पक्ष नोंदणीसाठभ कार्यकर्त्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अण्णासाहेब खंदारे यांनी करून जालना जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन हजार पेक्षा जास्त नोंदणी झाली असून सर्व कार्यकर्ते येथून पुढे जोमाने कामाला लागतील असे सांगून नोंदणी करतांना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे नोंदणीचे काम मंद गतीने होत असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख रऊफ परसुवाले, नंदाताई पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, त्रिंबक पाबळे, निळकंठ वायाळ, लक्ष्मण म्हसलेकर, राजेश काळे, इकबाल कुरेशी, राम सावंत, अ‍ॅड. राम कुर्‍हाडे, सुभाष मगरे, भागवत उफाड, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, अशोक उबाळे, शरद देशमुख, ज्ञानेश्‍वर कदम, अब्दुल बासेद कुरेशी, सय्यद करीम बिल्डर, फकीरा वाघ, भाऊसाहेब सोंळके, संजय भगत, अरूण मगरे, शेख शकील, अब्दुल रफिक, रहेम तांबोळी, अजीम बागवान, योगेश पाटील, संगीता कांबळे, शहराध्यक्ष जावेद शेख, जयसिंग राजपुत, चंद्रकांत रत्नपारखे, गणेश चांदोडे, शंकर जाधव, दिलीप मोरे, गणेश खरात, गजानन खरात, समाधान शेजुळ, अरूण घडलिंग, सोपान तिरूखे, दत्ता घुले, युवराज राठोड, नितीन कानडे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहर कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. उपस्थितांचे आभार फकिरा वाघ यांनी मानले.

नवनिर्वाचित जिल्हा युवक कॉग्रेस पदाधिकार्‍यांचा सत्कार
जालना जिल्ह्यात नविर्वाचित जिल्हा युवक कॉगे्रसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, महेश दसपुते भोकरदन अध्यक्ष, शेख वसिम जालना अध्यक्ष, दिपक कायंदे बदनापूर अध्यक्ष, शेख जुनेद, शेख नदिम पहेलवान, जुनेद खान प्रदेश युवक सचिव आणि सचिन कचरे जिल्हाउपाध्यक्ष, श्री. दिंडे आदि. पदाधिकारी निवडून आल्याबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आ. कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, सुरेशकुमार जेथलिया आदिंनी शाल, श्रीफळ पुष्पहार देवून सत्कार केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!