जालना तालुका
दोन मोटारसायकल च्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जख्मी
जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथील यशवंती ढाब्याजवळ जालना मंठा महामार्गावर दोन मोटर सायकल मध्ये अपघात झाला. यात एक जण गंभीररित्या जखमी झाला असून एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यशवंती धाग्या पासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एम एच क्रमांक 21 डब्ल्यू 46 11 व एम एच 21 ए ई 3549 या दोन मोटर सायकल मध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये एका जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर रित्या जखमी आहे . मौजपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अमृतास व गंभीर रित्या जखमी असलेल्या व्यक्तीस जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये दाखल करण्यात आले.