जालना जिल्हाब्रेकिंग बातम्यामराठावाडामहाराष्ट्र न्यूज

जालना ब्रेकींग |जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या सहा मूर्तींची चोरी

विधानसभेत उपस्थित केलेला प्रश्न
ग्रामस्थांची प्रतिक्रिया


जालना प्रतिनिधी : श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता माता, लक्ष्मण व हनुमानाच्या दोन पंचधातूच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास तीर्थक्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी) येथे घडली आहे. ऐतिहासिक मंदिरातून पंचधातूच्या सहा मूर्तींची चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

images (60)
images (60)

तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. या घटनेबाबत तीव्र संतापही व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विक्रांत शिंदे, डीवायएसपी सुनील पाटील, पोनि. प्रशांत महाजन, पोउपनि. संतोष मरळ आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. शिवाय तपासासाठी पथकेही रवाना केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चोरट्यांना महावितरणचे सहकार्य, ग्रामस्थांचा आरोप
चार हजार लोकसंख्येच्या तीर्थक्षेत्र जांबसमर्थ गावातील वीजपुरवठा सातत्याने गुल होत आहे. पहाटेच्या वेळीच अचानक वीजपुरवठा खंडित होत असून, महावितरणचा हा प्रकार म्हणजे चोरट्यांना सहकार्य करण्यासारखा असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मंदिरात सुरक्षा रक्षक नाही
जांब समर्थ मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा आहे. परंतु, या मंदिराच्या सुरक्षेसाठी अद्याप सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यात पहाटे वीज जात असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

विधमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ.राजेश टोपे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

मुंबई : घनसावंगी तालुक्यातील मौजे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील वैभव असलेल्या मूर्त्याची दिनांक 22 ऑगस्ट 2022 वार सोमवार रोजी रात्री चोरी झाली. मंदिरातील पंचधातूच्या मुख्य मूर्तीच चोरट्याने रात्रीच्या सुमारास पळवल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. 1535 मधील श्रीराम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. या घटनेबाबत तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे. जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामी स्वत: ज्या मूर्तींची पूजा करायचे,याबाबत विधीमंडळाच्या पावसाळी विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनीही प्रश्न उपस्थित केला. यावर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल, अशी ग्वाही दिली…

घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपपोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह डॉग स्कॉडसह फिंगर प्रिंट एक्स्पर्टची टीमही घटनास्थळी दाखल झाली. घटनेची संपूर्ण चौकशी पोलिसांकडून केल्या जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही ही पोलिसांकडून तपासले जात असल्याची माहिती समोर आली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!