जालना तालुका

पोलीस ठाणे मोजपुरीच्या मदतीला आता 100 पोलीस मित्र

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

दिनांक 07 सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे मीजपुरी यांचे वतीने गणेशोत्सव व नवरात्र संदर्भाने पोलीस ठाणे मोजपुरी हद्दीतील नवयुवक तरुणांची पोलीस मित्र दल स्थापण करण्यात आले आहे . सदर कार्यक्रमात पोलीस मित्र यांना त्यांचे कर्तव्य व गणपती विसर्जन संबंधाने योग्य त्या सुचना देण्यात आले आहे . पोलीस मित्रांची टीम बनवून त्यांना टी शर्ट , कैंप व व्हिसलचे वाटप करण्यात आले आहे .

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे , सहायक पोलीस निरीक्षक श्री . विलास मोरे व मोजपुरी गावाचे सरपंच श्री भागवत राऊत , गावातील प्रतिष्ठीत श्री सोनाजी खडेकर व शाम देशमुख , अनिरुद्ध डोंगरे , भगवान ढोकळे , मेघनाथ गायकवाड , बंडु काळे , दत्ता ढोकळे , नारायण अनपट , रामजी डोंगरे , बबन टेकाळे उटवद ग्रामपंचायत सदस्य , यांची उपस्थिती होती .

पोलीस ठाणे मोजपुरी येथे कर्मचा – यांची अपुरी संख्या असल्याने पोलीस कर्मचा – यावर बंदोबस्त काळात मोठा तणाव निर्माण होत होता यावर पर्याय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे यांनी पोलीस ठाणे मोजपुरी हद्दी मध्ये वयोगट 18 ते 30 दरम्याण असणा – या 100 युवकांची पोलीस मित्र म्हणून नियुक्ती केली .

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे साहेब , व सहायक पोलीस निरीक्षक श्री विलास मोरे यांनी पोलीस मित्रांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि प्रकाश जाधव यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उप निरीक्षक श्री राकेश नेटके , बीट अंमलदार पोहेको / 1172 प्रशांत देशमुख , पोहेको / 728 गोडबोले , पोहेकों / 1055 वाघ , सपोउपनि प्रकाश जाधव , सपोउपनि धायडे , पोहेको / हरणे , पोहेको ।।16 ईथापे , पोहेको / 1039 चव्हाण , पोहेकों / 1330 ज्ञानोबा बिरादार पोहेको / 409 नागरे , पोना / 346 खरात , पोना / 129 राजेंद्र देशमुख , पोना / 1416 सतीश श्रीवास गोपनीय शाखेचे पोकों / 1631 अविनाश मांन्टे , पोको 388 चैनसिंग नागलोत , पोको / 301 सागर खरे , पोको / 1145 इंगळे यांचे सह गृहरक्षक दलांचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली .

या उपक्रमाचे पोलीस ठाणे मोजपुरी हद्दीतून कौतुक होत आहे . दरम्याण पोलीस ठाणे मोजपुरी हद्दीतील प्रत्येक गावातून पोलीस मित्रांची नियुक्ती करण्यात आली .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!