जालना तालुका

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचेजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी स्वयंप्रेरणेने चालविलेली संपूर्ण शेती चळवळ हे ब्रीद असलेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघ या शेतकरी समूहाने ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.१२) रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

जाफराबाद तालुक्यासह अन्य महसूल मंडळात वीस हेक्टर पेक्षा अधिक सीताफळाचे लागवड असलेल्या महसूल मंडळांना फळपीक विम्याचे कवच देण्यात यावे. कृषी सहाय्यक यांच्यामार्फत गावागावातील पात्र सीताफळ बागायतदार शेतकऱ्यांचा सर्वे करण्यात यावा. स्थापन करण्यात येणाऱ्या सीताफळ बागायतदार शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापन करण्याचा खर्च शासनाने उचलावा. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने "स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प" म्हणून सीताफळ लागवड केलेल्या व एकरी किमान एक लाख रुपये देणाऱ्या बागांची पाहणी करून हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवावा. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या "स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प" अंतर्गत सीताफळ रोपवाटिका, लागवड, व्यवस्थापन, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, प्रक्रिया, स्टॉल उभारणी आदींचा खर्च शासनाने उचलावा. जिल्हा, राज्य, आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरासाठी ॲग्रोव्हिजन गटशेती संघातील शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करत जावा.

ॲग्रोव्हिजन गटशेती संघ गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला नियमितपणे कृषी चर्चासत्र, शेतीशाळा, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या सारखे कार्यक्रम घेत असते. शासकीय खर्च प्रमानक प्रमाणे तो खर्च ॲग्रोव्हिजन गटशेती संघास मिळत जावा. ॲग्रोव्हिजन गटशेती संघ प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेस अलटून पालटून वेगवेगळ्या गावात नियमितपणे मासिक चर्चासत्राचे आयोजन करत असते. या कार्यक्रमास शासनाच्या संबंधित प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबत आवश्यक करावे. ॲग्रोव्हिजन गटशेती संघ सातत्याने नवनवीन शेतकरी गट संघटन, क्षमता बांधणी करत असते. त्यासाठीचा निधी ॲग्रोव्हिजन गटशेती संघास मिळत जावा. ॲग्रोव्हिजन गटशेती संघ हा उत्कृष्ट संघटित असणारा व कार्य करणाऱ्या शेतकरी समुहापैकी एक शेतकरी समूह आहे. समूहात उत्कृष्ट शेती करणारे प्रगतीशील शेतकरी आहेत.

या समूहातील शेतकऱ्यांचा तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय "आत्मा" समिती, पिकविमा नुकसान संयुक्त समिती आदी समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून समावेश करत जावा. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ॲग्रोव्हिजन गटशेती संघाला जबाबदारी देण्यात यावी या सारख्या रास्त मागण्या केल्या असून या मागण्यांची योग्य ती दखल घेऊन तात्काळ त्या मार्गी लावाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.जिल्हा कृषी अधिक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयांनाही भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

यावेळी विविध गावातील ॲग्रोव्हिजन गटशेती समूहाचे नानासाहेब जगताप, शिवाजी जगताप, दत्तात्रय सवडे, बाबासाहेब जगताप, शंकर गाडेकर, नंदकिशोर देशमुख, भागवत मोरे, किशोर जंजाळ, सुधीर जोशी, पंढरीनाथ देठे, दत्तात्रय देठे, किशोर पंडित, रघुनाथ सवडे बालू जगताप, सुनिल जगताप यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!