जांबसमर्थ येथे वेदोच्चारात प्रभूश्रीराम मूर्तीची विधीवत स्थापन्ना

पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम
जालनाः जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील प्रभू रामचंद्र व इतर देवतांचे वेदोच्चारात शनिवारी पूजन झाल्यानंतर विविध धार्मिक विधीनंतर श्रीराम स्थानापन्न झाले. गत अडीच महिन्यानंतर श्रीराम पुन्हा एकदा आपल्या देवाऱ्यात बसल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. जय श्रीरामच्या गजराने आज पुन्हा अनेकांचया हृदयाचा ठाव घेऊन जल्लोषरूपी आनंद साजरा करण्यात आला.
साधारणपणे अडीच महिन्यांपूर्वी राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामी यांच्या देवघरातील म्हणजेच श्रीराम मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता तसेच अमूल्य अशा मूर्तींची चोरी झाली होती.
अथक प्रयत्नानंतर सर्व मूर्ती सापडल्या. शुक्रवारी अभूतपूर्व अशा शोभायात्रेनंतर आत सकाळपासूनच सकाळी सहा ते सात 13 अक्षरी त्रयोदक्षाक्षरी राममंत्रा जप,श्रीराम मूर्ती स्नपन विधी, उद्वार्चन सोहळा, व अभिषेक, विधी मुहूर्त व महाआरती, श्रीमारूतीस रूद्राभिषेक, पवमान स्वाहाकार व पूर्णाहुती, महाप्रसाद व साप्रंदायिक उपासनेनंतर सायंकाळी सर्व कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
समर्थ रामदास स्वामींचे वंशज प.पू.भूषणस्वामी यांनी सपत्नीक सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. सर्व वैदिक विधीसाठी महाराातून पुरोहित वर्ग उपस्थित होता. शास्त्रोक्त विधीनंतर श्रीराम स्थापन्न झाले. शनिवारी दिवसत भर परिसरातील अनेक गावांतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.