वाईट माणसांच्या संगतीने आपला वाईटच होतो-हभप सतिष म.शास्री
कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव
योग्य माणसांसोबत संगत केली तर चांगला होतो तर वाईट माणसांबरोबर मैत्री केली तर वाईटच होत असल्याचे मत ह.भ.प रामायणाचार्य सतिष महाराज शास्री बोररांजणीकर यांनी घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे रविवारी (१६) सातवे पुष्प गुंफताना मांडले.
मागणे ते एक तुजप्रती आहे |
देशील तरी पाहे पांडुरंगा ||
या संताशी निरवी हेची मज देई | आणिक दुजे काही मागे न देवा |
या जगदगुरू वैकुंठवाशी संत तुकाराम महाराज यांच्या तीन चरणाचा मागणीपर अभंगावर निरूपण करताना ह.भ.प.शास्री महाराज म्हणाले की,हे,देवा तुमच्याजवळ आम्हां भक्ताची एकच मागणे आहे ते म्हणजे आम्हांला तुझी चरणसेवा घडावी. एरवी चारी मुक्ती किंवा सर्व सिद्धी दिल्यास तरी आम्ही घेणार नाही.आम्हांला सदा सर्व काळ संत संगतीचे प्रेमळ सुख द्यावे.असे महाराजांनी किर्तनातून सांगितले. याचबरोबर लहान मुलांना संस्कार घडवा,तरूणांमध्ये सध्या व्यसनांचे प्रमाण वाढत असून व्यसन करू नका,कुणाची टिंगलटवाळी करू नका असा सल्ला ह. भ.प.सतिष महाराज शास्री यांनी शेवटी विनोदी शैलीच्या माध्यमातून दिला.
यावेळी ग्रामस्थ, महिला, पुरूष, नवयुवक तरूण मंडळ,पंचक्रोशीतील गायक, वादक,गुणीजन मंडळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.