आरोग्य मंञी राजेश टोपे यांची भोकरदन ग्रामिण रुग्णालयाला भेट.
मधुकर सहाने : भोकरदन
जालना जिल्हातील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता आज ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट देवुन पाहाणी केली,यावेळी आमदार संतोष पाटील दानवे,
मा आमदार चंद्रकांत पाटील दानवे, राजाभाऊ देशमुख,उपसंचालक डॉ. स्वनिल लाळे,जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अर्चना भोसले,अदि उपस्थित होते.
त्यामध्ये DCHC सुरू करणे जागेची पाहणी करून नियोजन करणे बाबत सूचना केल्या
तसेच वयोगट 18 ते 44 यांचे लसीकरण कक्षाला भेट दिली
व मंजूर उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी पदनिर्मिती बाबत सूचना केल्या
तसेच सध्या स्थितीत ग्रामीण रुग्णालय येथे आवश्यक मनुष्य बळ तात्काळ भरणे बाबत सूचना केल्या तसेच नवीन 102 क्रमांक अंबुलन्स मंजूर झाली असून व ग्रामीण रुग्णालयाला लागणारे इतर काही उपकरण तात्काळ देने बाबत वरिष्ठ अधिकारी यांना सूचना केल्या.
यावेळी डॉ. विवेक खतगावकर,डॉ. सोनखेडकर,डॉ. अमोल मुळे,डॉ सविता मेहेत्रे डॉ. वसीम,संदीप शिंदे,
मयूर थारेवाल,सीमा जाधव,
कावेरी गवळी,संजीव तुपे,श्री लक्क्स तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांन मध्ये रवींद्र बिनवडे जिल्हाधिकारी जालना ,अविनाश कोरडे उपविभागीय अधिकारी भोकरदन, संतोष गोरड तहसीलदार भोकरदन,पूजा दुधनाळे मुख्यधिकारी न प भोकरदन हे उपस्थित होते.