अंबड तालुका

कोरोना संसर्ग रूग्णांना समाजभान टिम ची मदत

images (60)
images (60)

व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरात नियोजन

अंबड/प्रतिनिधी

दिवसेंदिवस राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर बनत असल्याचे चित्र दिसत आहे.सामान्य माणूस भीती आणि नैराश्याच्या संभ्रमात सापडला आहे.माणूस माणसांपासून दुरावत जातोय.अशा अवस्थेत काही जण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करताना दिसत आहे.माणूसकीला बळ देताना पहायला मिळत आहे.अशाच प्रकारे अंबड येथील समाजभान टिमचे दादासाहेब थेटे हे सोशल मीडिया च्या माध्यमातून कोरोना रूग्णांना मदत करत आहे.

‘कोविड हेडलाईन्स महाराष्ट्र’या ग्रूपच्या माध्यमातून ते व त्यांचे मित्र कोरोना रूग्णांना येत असलेल्या अडचणीबद्दलची माहिती संकलित करून ती आप आपल्या मित्रांमध्ये आणि आप आपल्या भागातल्या ग्रुपच्या साहाय्याने पाठवितात.कोरोना रूग्णांसाठी ऑक्सीजेन, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देतात.रेमडेसिविर आणि इतर औषधीसाठी औषधी मित्र, प्रशासकीय अधिकारी, ते राजकीय कार्यकर्ते यांच्या मदतीने ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात.

त्याच बरोबर कोविड रूग्णांच्या प्लाझ्मा थेरपीसाठी उपयुक्त असणारा प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांना फोन करून त्यांना प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करतात.या सर्व कामांसाठी कोविड हेल्पलाईन महाराष्ट्रचे सर्व सदस्य सक्रिय योगदान देत आहेत.या ग्रुपच्या माध्यमातून प्लाझ्मादान मोहिमेसाठी गुगल फार्म बनवण्यात आला असून महाराष्ट्रात प्लाझ्मा माहिती संकलित करण्यात येत आहे.या ग्रुपच्या माध्यमातून ते कार्य होत असून दररोज राज्यभरातील 30 ते 50 रूग्णांना मदत पोहोचविण्याचा काम दादासाहेब थेटे व त्यांची टिम करीत आहे.

“कोरोना काळामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन जे जे शक्य असेल ते करण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरच डॉक्टर आणि कोविड हेल्पलाईन मित्रांच्या मदतीने कोविड सेंटर सुरू करण्याचा मानस आहे.नागरीकांनी प्लाझ्मा दान आणि इतर मदत कार्यासाठी सहभाग घ्यावा”.

दादासाहेब थेटे
समाजभान टिम

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!