परतूर तालुका

परतुर नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक भगवान चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांची नगर विकास मंत्री यांचेकडे तक्रार


दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

परतुर नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक भगवान चव्हाण यांच्या विरोधात नगरपालिकेचे गटनेते तथा शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , परतुर नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक भगवान यांनी पदाचा गैर वापर करीत त्यांनी कमावलेल्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, भगवान चव्हाण यांनी बरेच बोगस नामांतर प्रकरणे पैसे घेऊन केलेले आहेत ,कार्यालयात आलेल्या नागरिकांसोबत अरेरावीची भाषा करतात.प्रमाणपत्रावर सह्या करावयाच्या असतील तर पैशाची मागणी करतात, नामांतर करण्यासाठी बऱ्याचशा भूखंड धारकाकडून बॅटरमेंट चार्ज न घेता नियमानुसार पावती न फाडता पैसे घेऊन नामांतर केलेले आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे आसेही तक्रारीत म्हटले आहे. पुढे असे आहे की, नगरपरिषदेने ठराव घेऊन आरक्षित केलेल्या जागेचा सुद्धा यांनी पैसे घेऊन नामांतर केलेले आहे. मालकी रिव्हीजन प्रमाणपत्रावर अधिकार नसताना मुख्यअधिकारी यांच्या सह्या करतात .मुख्यालय ठिकाणी त्यांचे राहणे बंधनकारक असताना बाहेर गावावरून येणे-जाणे करतात व कार्यालयात वेळेवर येत नाहीत जे लोक पैसे देतात त्यांची कामे बाहेर हॉटेलमध्ये बसून सह्या करतात. परतूर नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक या पदाच्या माध्यमातून आडमाप गडगंज स्थावर व जंगम मालमत्ता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून जमा केलेली आहे .भगवान चव्हाण हे संवर्गातील कर्मचारी असून एकाच ठिकाणी अशा कर्मचाऱ्याला तीन वर्षापेक्षा जास्त राहता येत नाही परंतु भगवान चव्हाण यांना पाच वर्ष पेक्षा जास्त कालावधी एकाच ठिकाणी झालेला आहे भगवान चव्हाण हे कुठलेही बेबाकी प्रमाणपत्र अथवा ऑनलाइन बांधकाम परवाना पद्धत असताना बा-याचश्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या बांधकाम परवानावर सह्या केलेल्या आहेत. भगवान चव्हाण हे नगर परीषद कर्मचा-यांना सुद्धा उद्धटपणाची वागणुक देतात. दिलेल्या तक्रारीतील मुद्दे निहाय चौकशी करून भ्रष्टाचारी कार्यालयीन अधीक्षकास तात्काळ बडतर्फ करून त्यांनी नौकरीच्या माध्यमातून जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करून सर्व मालमत्ता जप्त करावी व भगवान चव्हाण यांच्यावर खटला दाखल करावा अशी मागणी परतुर नगरपालिकेचे गटनेता तथा शिवसेना जालना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


नगर विकास मंञी एकनाथ शिंदे यांनी मोहन अग्रवाल यांच्या निवेदनवर परतूर नगर परिषदचे कार्यालयीन अधिक्षक भगवान चव्हाण यांची चौकशी करून तत्काळ कार्यवाहीचे आदेश नगर विकास सचिव यांना दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!