तोताराम बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात माजी सैनिकांच्या हस्ते
मधुकर सहाने : भोकरदन
तोताराम बाबा उच्च माध्यमिक विद्यालय सिपोरा बाजार येथे स्वातंत्र्यदिनी त्रिदल सैनिक सेवा महासंघ भोकरदन जाफराबाद तालुका अध्यक्ष सेवानिवृत्त मेजर विष्णू लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महासंघाचे पदाधिकारी सेवानिवृत्त नायब सुभेदार संतोष राऊत तसेच सेवानिवृत्त माजी सैनिक व सेवारत महाराष्ट्र पोलीस खरात साहेब चिखली सेवारत सैनिक दिनेश सुरेश दांडगे व अंकुश रांधवण , संस्थेचे अध्यक्ष विजय कड तसेच उपाध्यक्ष शिवराम तात्या कड माजी (जिल्हा परिषद सदस्य ) विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती विद्या एस. कड /कुदर, प्रा. ऋषींदर खेडेकर प्रा.श्रीमती एस. एस. पाटील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी निवडक गावकरी यांची प्रमुख उपस्थिती होती
सर्व आजी-माजी देश सेवा करणाऱ्या सैनिकांचा विद्यालयाच्या वतीने श्री विजय पाटील कड यांनी सत्कार केला.
तदनंतर विद्यालयातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जे .एस. कुदर यांच्या हस्ते करन्यात आला देश सेवा व राष्ट्र सेवा आपल्या हातून घडण्यासाठी उपस्थितांना मेजर विष्णू लोखंडे यांनी प्रेरित केले व विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरा करण्यात आला.