भोकरदन तालुका
मदत फाऊंडेशन कडून पञकार सुरेश गिराम याच्या मुलाच्या उपचारासाठी 52 हजार रुपये मदत
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहरामध्ये काही दिवसांपूर्वी पत्रकार सुरेश गिराम यांच्या मुलाला डॉक्टरांनी लिव्हर चा आजार सांगितला होता त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती ही गोष्ट मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ यांना माहित पडली लगेच त्यांनी एक पोस्ट तयार करून सर्व मित्र परिवारांना विनंती केली कि आपल्यापरीने जी शक्य होईल ती मदत करावी तब्बल दोन दिवसांमध्ये 52000 हजार रुपये त्या 2 महिन्याच्या लहान मुलांसाठी जमा झाले आज ती मदत व माझ बैंक स्टेटमेंट मुलाचे वडिल सुरेश गिराम यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटिल पडोळ,अमोल जाधव, सरपंच सूरज पाटिल सहाने, गणेश पडोळ,सूरज मव्हारे,अर्जुन ठाले, विशाल पोटे,राजेश साबळे,विकास हिवाळे,उपस्थित होते.