राष्ट्रीय नेते खा राहुल गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मी निषेध करतो त्रींबकराव पाबळे
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन येथील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आंदोलन प्रसंगी तालुका अध्यक्ष पाबळे म्हणाले की काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्या विरुद्ध बदनापूर येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल मी त्यांचा काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध करतो केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यापूर्वी ही शेतकरी व भारतीय सैनिक यांच्या बदल बेताल वक्तव्य करून भोकरदनचा नावलोकीक खराब केला असून समाज माध्यमावर त्यांची वाचाळवीर म्हणून प्रतिमा झाली आहे असेच बेताल वक्तव्य ते जर करीत राहिले तर जनता त्यांना माफ करणार नाही असे पाबळे म्हणाले.
यावेळी रावसाहेब दानवे मुडदाबाद,या दांनवेचे करायचे काय?खाली मुंडके वर पाय,रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या
या आंदोलनाला तालुका अध्यक्ष त्रींबकराव पाबळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते, विशाल गाढे, सलीम काझी,सेवादल अध्यक्ष दादाराव भोंबे, काँग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सोपान सपकाळ, रमेश जाधव, विश्वास वाघ,माजी नगरसेवक श्रावण आक्से,असंघटित कामगारचे कार्याध्यक्ष कैलास सुरडकर, प्रतापराव शिंदे,शेख जहीर,किशोर शिंदे,रोषण देशमुख, भाऊसाहेब सोळुंके आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.