पोलीस पाटलांचे विविध मागण्यांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन
आष्टी(प्रतिनिधी)थकीत मानधन,प्रवास भत्ता व कोविड काळातील अतिरिक्त मानधन वितरित करण्यात यावे या सह इतर काही मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जालना यांना नुकतेच सादर केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की,जालना जिल्हा पोलीस पाटील असोसिएशन च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही सर्व पोलीस पाटील महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशनचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील निवेदन देत असून जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याने सदरील मानधन प्रत्येक महिन्याला देण्यात यावे,२०१२ पासूनचा थकीत असलेला प्रवास भत्ता देण्यात यावा,कोविड काळातील अतिरिक्त मानधन वितरित करण्यात यावे व तसेच जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात अशी मागणी निवेदन कर्त्यानी केली आहे, पुढे निवेदनात म्हंटले आहे की,कोविड १९च्या काळात कर्तव्यावर असताना पोलीस पाटील यांचे दुखद निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व उत्कृष्ट पोलीस पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर पोलीस पाटील असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष बबनराव डोळस यांच्या सह अर्जुन ढगे जालना,इंदुमती झरेकर परतूर,ईश्वर वाघमारे घनसावंगी,रमेशराव बाबासाहेब मंठा,कैलास गुंजाळ,रामचंद्र वाघमारे,कचरू मगर,गुळवे पाटील,यांच्या सह आदी पोलीस पाटलांच्या स्वाक्षर्या आहेत.