त्या सिमेंट रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी
नसता ते देयके थांबवण्याची थांबवा
राजेश्वर नायक /आष्टी :- आष्टी ता परतूर येथे सध्या सुरू असलेल्या करस्कर मारोती कडे जाणार रस्ता, भिल्ल गल्ली,बकर खाटीक गल्ली या ठिकाणी होत असलेला सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याने या कामाची चौकशी होई पर्यंत या कामाचे धनादेश,देयक, बील देऊ नये या मागणीचे निवेदन आष्टी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी नुकतेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांना या बाबत निवेदन देण्यात आले असून यात असे म्हंटले आहे
करस्कर मारोती कडे जाणार रस्ता, भिल्ल गल्ली,बकर खाटीक गल्ली या ठिकाणी सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत असून या कामात मतिमिश्रित वाळू,मतिमिश्रित खडी,मतिमिश्रित कच वापरण्यात येत असल्याने हे काम निकृष्ट होत आहे त्याच बरोबर हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसुन थातूर मातूर निकृष्ट होत आहे काम करताना साफसफाई न करणे,रोलर ने दबाई न करणे,मुरुमीकरण न करणे,मेटल न टाकणे,बेड न करताच सिमेंट रस्त्याचे काम करून शासनाची दिशाभूल करून या कामावरचे गुत्तेदर व संबंधित अभियंता सह अधिकारी अंदाजपत्रका नुसार काम न करता निधी लाटण्याचा प्रयत्न करित आहे.संदर्भित काम हे दर्जेदार करून कामाची चौकशी करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य यांनी केली आहे
तरी या कामाची चौकशी करून कार्यवाही करावी व जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही तो पर्यंत कामाचे धनादेश, देयक,बील देऊ नये व या कामाची गुणवत्ता तपासुन अंदाजपत्रका प्रमाणे दर्जेदार काम करून घ्यावे असे न केल्यास येत्या 10 दिवसात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर साहेरा बानो गु मुर्तुजा खाटीक,भगवान यमाजी कांबळे,हालीमाबी हारून कुरेशी या तीन ग्रामपंचायत सदस्यांच्या या वर स्वाक्षऱ्या आहेत