कै.संतोष पाटील यांच्या परिवारालासाठी ग्रामसेवक देणार एक दिवसाची वेतन
राज्यकोषाध्यक्ष संजीवजी निकम यांच्या आव्हाना प्रतिसाद
मधुकर सहाने : भोकरदन
कै. संतोष पाटील ग्रामसेवक पंचायत समिती भोकरदन जिल्हा जालना यांनी अकस्मात कौटूंबिक कलहातुन जिवन यात्रा संपवली त्या निमित्ताने सांत्वन पर भेटी साठी त्याच्या कुटूंबाला राज्य कोषाध्यक्ष संजीवजी निकम , जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष के.डी.पाटील यांनी भेट देवून पाटील यांच्या कुटूबाचे सात्वन केले.
पंचायत समिती भोकरदन सभागृहात राज्य कोषाध्यक्ष संजीवजी निकम यांनी भोकरदन तालुक्यातील ग्रामसेवकाची बैठक घेऊन स्थानिक समस्या जिल्हा व राज्य स्थरावरील समस्या वर सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन केले व कै. संतोष पाटील ग्रामसेवक यांच्या कुटूंबास आर्थिक मदती संबंधि चर्चा केली त्यावेळी तालुक्यातील सर्व उपस्थित ग्रामसेवकानी त्स्फूर्तपणे तालुक्यातील 105 ग्रामसेवका कडून 1 दिवसाचे वेतन देण्याचे ठरवले व जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हा कल्याण निधी मधून रोख 25000/- जालना जिल्हा ग्रामसेवक पतपेढी कडून 150000/-व जिल्ह्यातील ग्रामसेवकाना आव्हान करून प्रत्येकी 1000/- रु मदत देण्याचे निश्चित केले व सोबत संजीवजी निकम राज्य कोषाध्यक्ष यांनी 5000/-रु वैयक्तिक मदत केली. जिल्हा कल्याण निधीतील 25000/-रोख रक्कम संतोष पाटील यांच्या कुटूंबाला इतर विधीसाठी दिली इतर सर्व जमा होणारी रक्कम कै. संतोष पाटील याच्या मुलीच्या नावे ग्रामसेवक सहकारी पतसंस्था जालना येथे फिक्स डिपॉझिट करायचे ठरले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष एस.डी.शेळके साहेब, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा मानद अध्यक्ष जालना पी.बी.पवार, जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, जिल्हा सरचिटणीस पी.एस. वाघ , जिल्हा कोषाध्यक्ष ए.आर.काकडे, जिल्हा कायदे सल्लागार साळवे , भोकरदन तालुकाध्यक्ष एम.एल. गायकवाड ,भोकरदन तालुका सचिव सिध्दार्थ पगारे , परतूर तालुका सचिव ई.यू.दडमल, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष राजीवजी पिंपळे साहेब, काँन्सिलर मदन डोईफोडे, सुरडकर ,आजी माजी पदाधिकारी,भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बंधू भगिनी सोबत होते.