ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा भोकरदन नगरपरिषदेच्या वतीने निषेध
भोकरदन : भोकरदन
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे हे अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता.कारवाई दरम्यान, कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने चाकूचा हल्ला केला.या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून पडली आहे.तसेच त्यांच्या अंगरक्षकावर सुद्धा हल्ला करण्यात आला याच्या निषेधार्त भोकरदन नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भोकरदन नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक बी.जी. आडे, नगर अभियंता किशोर ढेपले, लेखापाल विश्वजीत गवते व कर्मचारी बजरंग धुळेकर,वैभव पुणेकर,भूषण पळसपगार,परसराम ढोके,पंजाब देशमुख,अंबादास इंगळे,दिपक सिंगल, गोवर्धन सोनवणे,अमित गुंटूर,कैलास जाधव,सोमनाथ बिरारे आदि कर्मचारी उपस्थित होते.