बबनराव वाघ, उपसंपादक
बीड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी 9 ग्रामसेवकांनी काम न करताच वेतन उचलण्याचा प्रताप केलाय. एक-दोन महाभाग नव्हे तर तब्बल 9 जणांनी कामावर न जाता पगार उचलत या महाभागांनी काम न करताच शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
काम केल्यास मोबदला मिळतो असं ऐकलं होतं. मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काहीजणांनी काही काम न करताच मोबदला मिळवला. मात्र या महाभाग ग्रामसेवक अधिकाऱ्यांना आता हिशोब चुकता करावा लागणार आहे. काम न करतात ज्या महाभाग ग्रामसेवकांनी दाम उचलले, त्यांना ते आता वापस करावे लागणार आहेत. नेमका काय आहे प्रकार पाहुयात.
काय आहे नेमका हा प्रकार?
गेवराई तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत एका माहिती अधिकारी कार्यकर्त्यांने आरटीआय टाकला. अनेक वेळा कामावर कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे या आरटीआय कार्यकर्त्यांना दहा ग्रामसेवकांची माहिती मागवली. मात्र ही माहिती देण्यास पहिल्यांदा टाळाटाळ करण्यात आली. तब्बल चार महिन्यानंतर ही माहिती त्यांना देण्यात आली. तेव्हापासून या कार्यकर्त्यांना या सर्वांवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी करायला सुरुवात केली. मात्र, अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली आणि जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्याकडे गुप्तपणे अहवाल पाठवला. याला नऊ महिन्याचा वेळ लागला. मात्र या आरटीआय कार्यकर्त्यांनी याचा पिच्छा सोडला नाही आणि या दहा जणांना पैकी नऊ जणांचे पितळ उघड पडलं. यात थोडेथोडके नव्हे तर या नऊ महाभागांनी काम न करताच शासनाचे 51 लाख रुपये उचलले. या काळात ते कुठल्याही पदावर नव्हते ते कुठे रुजू झाले नाहीत आणि कुठं काम हे केलं नाही, मात्र त्यांच्या अकाउंटवर महिन्याला पगार झाला. हा सर्व प्रकार आता माहितीच्या अधिकारातून उघड झालेला आहे. त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि कारवाईचा बडगा उगारला.दरम्यान, आता त्यांच्या पगारातून त्यांनी उचललेली रक्कम कापण्यात येणार आहे. मात्र त्यांनी प्रशासनाची दिशाभूल केली असल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे