अंबड तालुकाघनसावंगी तालुकाजालना जिल्हाबीड जिल्हा

गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी -आ.राजेश टोपे

आमदार राजेश टोपे यांनी माध्यमाना दिलेली प्रतिक्रिया


अंबड: दिनांक 25 जुलै 2022 वार सोमवारी रोजी राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना.आमदार रोजश टोपे यांनी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत असल्याने. नाशिक व नगर परिसरात भरपूर पाऊस झाल्याने जायकवाडी धरण ९० टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. यामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या संदर्भात आढावा बैठक घेतली.आ.राजेश टोपे यांनी जायकवाडी कडाचे वरिष्ठ अभियंता श्री. जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.यावेळी .जाधव यांनी उद्या दिनांक 26 जुलै 2022 रोजी सकाळी १० वाजता धरणाच्या चार दरवाजे उघडण्यात येणार आसून त्यामधून १० ते १२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.

images (60)
images (60)

यावेळी आमदार राजेश टोपे यांनी गोदाकाठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.विशेषतः जायकवाडी नदीच्या डाव्या बाजूकडील अंबड, घनसावंगी,परतूर आणि उजव्या बाजूकडील माजलगाव, गेवराई भागातील गोदाकाठच्या गावात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी.घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे.आ.राजेश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.नदीपात्रालगतच्या भागातील शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे, मोटारी, विद्युत उपकरणे तसेच पाळीव प्राणी,जनावरे यांना सुरक्षित ठेवावे.नदीलगतच्या घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे गावकऱ्यांची काळजी घ्यावी. कुठलीही समस्या उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांना सूचित करावे असे आवाहन आमदार राजेश टोपे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!