वाहेगाव सोपारा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या आश्रुंवर ‘आधारवड’ कडुन फुंकार!
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
परतुर तालुक्यातील वाहेगाव सोपारा येथील दत्ता मछींद्र काटे (वय ५०) यांनी बुधवार दिंनाक १५ सप्टेंबर रोजी शेतातील झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली होती. त्यांच्या पाठीमागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे या कुटुंबांवर दुखा:चा डोंगर कोसळला. त्यांचे सांत्वन करुन धीर देण्यासाठी आधारवड फाऊंडेशन कडुन तातडीने दहा हजार रुपयांची अर्थीक मदत तसेच त्यांच्या तिनही मुला-मुलींना शैक्षणिक दत्तक घेण्यात आले आहे.
धनादेशाचे वाटप परतुर चे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसिलदार रुपा चित्रक यांच्या हस्ते वाहेगाव सोपानराव येथे प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आले. एका दाण्यापासून हजारो दाने बनवणारा शेतकरी अतिवृष्टीने खचला आहे. परंतु त्यावर कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या हा पर्याय म्हणुन निवडू नये अशी हात जोडून विनंती भाऊसाहेब जाधव यांनी गावातील सर्व शेतकरी बांधवांना केली. यावेळेस आधारवड फाऊंडेशन चे कोषाध्यक्ष देविदास कर्हाळे, आष्टी विभाग संपर्कप्रमुख संतोष खंडागळे तसेच वाहेगाव सोपाराचे सरपंच, उपसरपंच सुनील काटे, रोहन वाघमारे, अशोक काटे, मनोज काटे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी इत्यादी उपस्थित होते.
“संकटकाळ आहे परंतु खचुन जाऊ नका. तुम्ही हयात नसल्यावर तुमचे वृद्ध आई-वडील, बायको-पोरांचे काय होईल याचा शांतपणे विचार करा म्हणजे आत्महत्या करण्याचा विचारही तुमच्या मनाला शिवनार नाही.”
शाम वाढेकर
अध्यक्ष आधारवड फाउंडेशन