टेक्नॉलॉजीमहाराष्ट्र न्यूजलाइफस्टाइल
आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे , ही आहे बघा प्रोसेस
मुंबई: सध्या कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासोबत बँक खाते उघडणे किंवा नवीन सिम मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे, जर ते नसेल तर तुम्हाला या सेवा मिळणार नाहीत.
अशा परिस्थितीत तुमच्याकडे आधार कार्ड असणे आणि त्यातील सर्व माहिती बरोबर असणे महत्वाचे ठरते.दरम्यान पहिल्यांदा आधार कार्ड नोंदणी करतेवेळी जर तुमच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये काही चूक झाली असेल, जसे की तुमचे नाव, लिंग किंवा जन्मतारीखेत चूक झाली असेल तर आता तुम्ही ही माहिती स्वतःच अपडेट करू शकता. UIDAI ने आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टल सुरु केले आहे, आज आपण या पोर्टलर आधारकार्ड सेल्फ अपडेट करण्याची पध्दत जाणून घेणार आहोत.