देश विदेश न्यूजब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र न्यूजसंपादकीय

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | महिलाना ही शेवटची संधी

मुंबई :

images (60)
images (60)
विडिओ

महाराष्ट् राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू करण्यात आले होते. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लाडक्या बहिणींना (Ladki bahin yoajana) मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत ही आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज सादर केले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे.
त्यामुळे, आता लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) नव्याने अर्ज करण्याची एक संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसांत ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज सादर केले नाहीत त्यांना अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांचे हफ्ते सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!