अविनाश राठोड यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर विधानसभा क्षेञातील नायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश राठोड यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून २०२०-२०२१ चा, सामाजिक, ग्रामविकास, आदिवासी कल्याण व बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल “समाज भूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
अविनाश राठोड यांनी अशा विविध पुरस्कारामुळे मला ऊर्जा प्राप्त होते आणि काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. त्याचप्रमाणे आगामी काळात आपण विविध सामाजिक व राजकीय कामे करणार असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी हा पुरस्कार माझा नसून माझ्या गावकऱ्यांचा आहे.शेवटी त्यांनी राजनंदनी बहुद्देशीय संस्थाचे संचालक व सदस्यांचे आभार मानले.
२३ डिसेंबर रोजी सरपंच सेवा संघातर्फे कोरोना काळात गावामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय “कोरोना युद्ध पुरस्काराने” सुद्धा राठोड यांचा सन्मान होणार आहे.
या पुरस्कारामुळे राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.