कोरोनामुक्त होण्यासाठी लसीकरण महत्वाचे – तहसिलदार रुपा चित्रक.
पाटोदा- ता.परतुर (चत्रभुज खवल)
संपुर्ण जगात थैमान घालणार्या कोरोना या आजारातुन आपला देश लवकरच मुक्त होईल असा आशावाद परतुरच्या तहसिलदार रुपा चित्रक यांनी व्यक्त केला. आपल्या देशातील लोकसंख्येची घनता व लोकसंख्या मोठी असुनही सामाजिक अंतर व प्रभावीपणे राबण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम या मुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले .
पाटोदा[माव] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील पंधरा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसिकरण कार्यक्रमाचे ऊद्घाटण प्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षक – पालक – संस्थाचालक यांच्या सहकार्यातुन या वयोगटातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण आपण पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी नेहा पुजरवाड यांनी लसीकरणाबाबत अनेक शंकाचे निरसन करुन लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले .कोणतीही शंका मनात न बाळगता पालकांनी आपल्या पाल्यास लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान आज रोजी वर्ग नवु व दहा मधील शहांशी [86] विद्यार्थ्यांना कोव्हॕक्सीन ही लस देण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल ,आरोग्य रक्षक आर.आर. तोटे, जी.बी.बुधवंत , आरोग्य सेवक पि.एम.प्रधान ,आरोग्य सेविका श्रीमती एल.एस.वैद्य,मंडळाधीकारी शरद कुळकर्णी,कृष्णाजी सोनवने ,पालक प्रतिनीधी दिनेश खवल, छबुराव मुंढे,बालासाहेब नखाते,भिमराव शिंदे,सदाशीव खवल,मुख्याध्यापक अंभोरे सर आदी ऊपस्थीत होते.
प्रास्तावीक मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर व सुत्र संचालन चत्रभुज खवल – आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.भारत मातेची प्रतीमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व कर्मचारी ऊपस्थीत होते.