जळगाव सपकाळ येथे घरकुलाच्या प्रारुप यादीच्या लाभार्थ्याकडुन घरपट्टीची वसुली
जळगाव सपकाळ — भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील ग्रामपंचायतीने पतंप्रधान घरकुल अावास योजनेच्या ४२२ लाभार्थ्याची प्रारुप यादी गावाच्या वेशीत लावुन त्याच्याकडुन घरपट्टीच्या नावाखाली पाचशे रुपयांची वसुली सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर अाली अाहे.
गावठान मध्ये रहिवाशी असलेल्या ग्रामस्थांना घरपट्टी अनिवार्य अाहे माञ घरकुलाचे दिवा स्वप्न बघत असलेल्या घरकुल लाभार्थी यांच्याकडुन त्यांच्या घरकुलाची शाश्वती प्रारुप यादीतुन नसतांनाही तसेच अनेकांच्या नावावर गावठान मध्ये जागा नसतांनाही ग्रामपंचायत घरकुल येण्या अगोदरच त्या लाभार्थ्याकडुन घरपट्टी वसुली करत असल्याने शासनाच्या वसुलीच्या नावाखाली सामान्य पावती देऊन घरपट्टी वसुलीचे टार्गेट पुर्ण करत अाहे त्यातच घरकुल लाभार्थी यांना अापल्याला घरकुल मंजुर झाले असल्याचे यादीवरुन जाणवत असल्याने घर मिळण्या अगोदरच घरपट्टी भरत अाहे माञ लागलेली यादी प्रारुप स्वरुपाची असल्याने त्याची शहानिशा होऊन यादी नावे असलेल्या लाभार्थी यांचा सर्वे होऊन पाञ यादी नंतर प्रसिध्द होणार अाहे परंतु यांची घरकुल लाभार्थी यांना कल्पना नसल्याने ग्रामपंचायतीची घरपट्टीच्या नावाखाली घरकुल लाभार्थ्याकडुन वसुली माञ जोरात सुरु अाहे यांची संबधीत अधिकार्यांनी चौकशी करुन घरकुल लाभार्थ्याची लुट थांबवावी अशी मागणी होत अाहे.
याविषयी ग्रामविकास अधिकारी महेंद्रकुमार साबळे यांना विचारले असता प्रशासनाच्या अादेशानेच घरपट्टी वसुली सुरु अाहे माञ घरकुलाच्या प्रारुप यादीच्या लाभार्थी यांच्याकडुन सुरु असलेल्या वसुली बाबत बोलण्याचे त्यांनी टाळले असल्याने या बाबत सभ्रम निर्माण होत अाहे.
गावठाण मध्ये ज्यांच्या नावांवर जागा अाहे त्यांच्याकडुन घरपट्टी वसुली करावी माञ अामच्या नावांवर जागाच नाही तसेच अाता अावास योजनेच्या प्रारुप यादीत नाव अाले परंतु अजुन घरकुल येण्याची शाश्वत्ता नाही अण ग्रामपंचायतीची अातापासुनच घरपट्टीच्या नावाखाली वसुली सुरु असल्याने नाराजी व्यक्त होत असल्याचे घरकुल लाभार्थी विनोद सपकाळ यांनी सांगितले.