माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी जाहीर माफी मागावी – प्रकाश सोळंके
दिपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क
भारतरत्न लता (दीदी) मंगेशकर यांचे दुःखद निधन झालेले असतांना , या दुःखद घटनेमुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला असतांना माजी आमदार सुरेश जेथलीया यांनी वाढ दिवसाचा जाहीर कार्यक्रम कार्यालयात आयोजीत केला. माजी आमदार सुरेश जेथलीया यांनी या दुःखद घटनेमध्ये सहभागी न होता या दिवशी मी जन्मदिन साजरा करणार नाही किवा कोणाचा हि सत्कार स्वीकारल्या जाणार नाही ,अशा प्रकारचे आव्हान करायला पाहीजे होते, पण असे काही केले नाही,
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे जन्मदिन येत असतात जात असतात परंतु या सगळ्यांना दुःखद गोष्टीची माहिती होती. महाराष्ट्र शासनाने ता.७/०२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती, मराठी भारत रत्न पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले एवढी मोठी दुःखद घटना घडल्यानंतर देशाच्या प्रती लता दीदीने केलेले काम लक्षात घेऊन अनेक लोकांनी आपले राजकीय असो या खाजगी कार्यक्रम रद्द केले परंतु माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी लता दीदी मंगेशकर मराठी असल्यामुळे या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले .राष्ट्रीय दुखवट्यात सहभागी न होता आनंद व्यक्त करून मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात स्वतःचा वाढ दिवस साजरा केला म्हणून सुरेश जेथलिया यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपञकाद्वारे केली आहे.