हिसोडा-जळगाव सपकाळ रस्त्यावर कार पल्टी होऊन चालकाचा मृत्यु
जळगाव सपकाळ:परिसरात सुरू असलेल्या टावरचे कामे पाहणी करण्यासाठी स्विफ्ट डिझायर वाहनाने येत असलेल्या चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने असणाऱ्या वाहनाने दोन-चार पल्टी मारल्याने भिषण अपघात झाला आहे.
सदर अपघात भोकरदन तालुक्यातील हिसोडा ते जळगाव सपकाळ रस्त्यावर झाला असुन या अपघात मृत झालेल्या तरुणाचे नाव अादम युन्नुस तडवी(२६) असे आहे.तो हिसोडा येथील रहिवासी आहे.. घरची परिस्थिती जेमतेम त्यातच वडीलाचे काही वर्षापूर्वी निधन झाल्याने अादम तडवी हा मागील चार ते पाच वर्षापासून टावरच्या कामावर होता.परिसरातील विविध कंपनीच्या लहान-मोठी कामे तो यशस्वीपणे संभाळत असे.त्यामुळे टावर मालकाचा देखील त्याच्यावर विश्वास होता.पंरतु शुक्रवारी हिसोडा येथे कामानिमित्त घरी येण्यासाठी त्याने मालकाची स्विफ्ट डिझायर गाडी आणली.आणि काम आटोपून पुन्हा तो हिसोडा येथुन जळगाव सपकाळ रस्त्याकडे निघाला पंरतु वाहन भरधाव असल्याने अादमला वळण रस्त्याचा अंदाज आल्याने त्याचे वाहनावरचे नियंत्रण सुटून वाहनाने तीन ते चार पल्टी मारुन वाहन रस्त्यावर काही अंतरावर फेकल्या गेले.मोठ्याने आवाज आल्याने रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी त्याला गाडीतुन बाहेर काढून खाजगी वाहनाने सिल्लोड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
पंरतु डाँक्टरानी त्याला तपासून मृत घोषित केले आहे.अादमचे लग्न होऊन केवळ दोन वर्ष झाले होते.वडीलाच्या निधनानंतर घरची संपूर्ण मदार त्याच्यावर होती.त्याच्या पाश्चात्त आई,पत्नी,भाऊ आणि एक मुलगा असा परिवार आहे