कल्याण बागल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
येथील गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक कल्याण श्रीरामराव बागल पाटील यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येत्या रविवारी (दि.१३) सकाळी १०:३० वाजता अंबड शहरातील गायनाचार्य पं.गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात बागल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षीचा हा पुरस्कार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातोना बु.शाळेच्या श्रीमती करवा नरसाबाई संदीप,जि. प.प्रशाला सातोना खु.शाळेचे संजय सुखदेव मगर,जि. प. प्रा.शाळा गणेशपूर शाळेचे कुलकर्णी रमेश शिवाजीराव तर परतूर प्रशालेचे गोरे संजय बाबुराव यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान, या पुरस्काराबद्दल सर्व आदर्श शिक्षकांचे शिक्षणाधिकारी मंगला धुपे,कैलास दातखिळ,गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे,गटविकास अधिकारी महादेव गगनबोने,माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे,राज्य पत्रकार संघाचे परतूर तालुक्याचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, विष्णू कदम,राम सोळंके, रामेश्वर हातकडके,प्रकाश ढवळे, शंकर थोटे आदींनी अभिनंदन केले आहे.