मंजूर असलेल्या वस्तीगृहासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला भाग, प्रशासनाला येईल का आता तरी जाग.
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सावरखेड शिवारात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह 2007-08 मध्येच मंजूर करण्यात आले होते, परंतु 2022 साल उजाडले तरीही वसतीगृह अजूनही सुरू झाले नाही. याकरिता समाज बांधवांसह विविध संघटनांनी निवेदने देऊन वसतीगृह सुरू करण्यासाठी विनंती केली होती, एव्हढेच के तर आमरण उपोषण ही करण्यात आले परंतु अजूनही वसतीगृह सुरू करण्याबाबत काहीच कार्यवाही होतांना दिसत नाही, त्यामुळे आता समाज बांधवांच्या वतीने प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे, जाफराबाद तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना देण्यात आलेल्या निवेदनात तसे नमूद असून जोपर्यंत वसतीगृह सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका यावेळी समाजबांधवांनी घेतली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात सर्व तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतीगृह आहेत परंतु जाफराबाद तालुक्यातील वसतीगृह अजूनही होत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे निवेदन कर्त्यांनी सांगितले असून तालुका तेथे वसतीगृह हे शासनाचे धोरण फक्त कागदावरच आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला व जोपर्यंत वसतीगृह चा विषय व इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील . येणाऱ्या 04 एप्रिल 2022 रोजी तहसील कार्यालय आवारात संविधान अंमलबजावणी आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी राहुल गवई, किरण सोनुने, आकाश हिवाळे, अतुल जाधव, अशोक म्हस्के, भीमजयंती चे अध्यक्ष अमोल आढावे, अमोल गायकवाड, भूषण जाधव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.