देळेगव्हाण शेतात गांज्याची लागवड ,३२७ किलो ओला गांजा जप्त
जालना प्रतिनिधी:
जालना जिल्ह्यातील टेम्भुर्णी जवळील देळेगव्हाण शिवारातील शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 28.11.2022 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रभारी रविंद्र ठाकरे यांना गोपनीय माहीती मिळाली की देळेगव्हाण शिवार ता जाफ्राबाद येथे दोन इसमांनी त्यांचे शेतात स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहेत अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत मा. पोलीस अधिक्षक व मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो भोकरदन यांना रेडबाबत माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करणे कामी तहसिल कार्यालय सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना माहीती देवुन दोन शासकीय पंच असे माहीतीचे ठिकाणी छापा मारला असता देळेगव्हाण शिवारातील गट 571 मध्ये सुखदेव भाऊराव कापसे या इसमांने कपाशीचे शेतात अवैध गांजाची झाडे लागवड करून संवर्धन करीत असतांना मिळुन आल्याने त्यांचे शेतातुन एकुण 327 किलो ओला गांजाची झाडे एकुण 32 लक्ष 70000/- रुपये किमतीची जप्त केली आहेत. दुसरे ठिकाणी देळेगव्हाण शिवारातील गट क्रमांक 663 मध्ये इसम नामे अशोक भागाजी कापसे याने सुध्दा कपाशीचे शेतात गांज्याची झाडाची लागवड केल्याची माहीतीवरून छापा कारवाई करुन त्यांचे शेतातुन एकुण 38 किलो ओला गांजाची झाडे किमती 370000/- रुपयाचा गांजा असा दोन्ही घटनास्थळावरुन एकुण 365 किलो ओला गांजा किमती 36,50000/- रुपये चा जप्त केला आहे. वर नमुद दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आलेले असुन त्यांचे विरुध्द NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री अक्षय शिंदे साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. इंदल बहुरे साो यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि रविंद्र ठाकरे, नायब तहसिलदार श्रीमती पप्पुलवाड, पोउपनि सतिष दिंडे तलाठी श्रीमती उषा म्हस्के, कृषी सहायक श्री. विठठल नखोद, पोलीस कर्मचारी पंडीत गवळी, रामेश्वर सिनकर, गजेंद्र भुतेकर, प्रदीप धोंडगे, सागर शिवरकर, दिनकर चंदनशिवे, मंगेश शिंदे, सचिन तिडके, त्र्यंबक सातपुते, अशोक घोंगे, छाया निकम, गणेश खार्डे, धनंजय झाल्टे यांनी केली आहे.