शिवसेनेच्या वतीने ईदगाह येथे मुस्लीम बांधवांवर शुभेच्छाचा वर्षाव..
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शिवसेनेच्या वतीने ईदगाह मसला रोड येथे शहरातील सर्व मुस्लिम बांधवानां रमजान ईद निमित्त पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या.मागील दोन वर्षा पासुन कोरोणामुळे ईदगाह वरील नमाज पठण , सार्वजनिक सण उत्सव बंद असल्याने या वर्षी मोठ्या उत्साह व जल्लोशात रमजान ईद साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख माधव मामा कदम,तालुका प्रमुख अशोकराव अघाव, सुदर्शन बाप्पा सोळंके,माजी नगर सेवक शरिफ कुरैशी, माजी नगर सेवक लक्ष्मीकांत भैया कवडी, शिवसेना नेते महेश नळगे ,शहर प्रमुख विदूर जईद,शहर प्रमुख दत्ता सुरूंग,अल्पसंख्यांक शहर प्रमुख अहेमद चाउस ,उपशहर प्रमुख दिपक हिवाळे, राहुल कदम, विकास खरात ,बाळु गाते ,सतीष हजारे, व आदी शिवसैनिकांनी मुस्लीम बांधवावर फुलांचा वर्षाव केला. या ठिकाणी पोलीस विभागा मार्फतही मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्या देण्यात आल्या.