घनसावंगी येथे 42 वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्या उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा
जालना:-
स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय घनसांगवी जिल्हा जालना रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगी येथे 10 व 11 डिसेंबर रोजी होत आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते साडेदहा वाजता घनसावंगी येथे होत आहे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष माननीय श शेषरावजी मोहिते सुप्रसिद्ध साहित्यिक लातूर, मावळते संमेलन अध्यक्ष माननीय श्री बाबू बिराजदार सुप्रसिद्ध साहित्य देगलूर, हे आहेत माननीय माजी आमदार शिवाजी चोथे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष यांच्या अधिपत्याखाली हे संमेलन होत आहे स्थळ महादंबा साहित्य नगरी संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय घनसांगवी या ठिकाणी होत आहे
यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती अंबादासजी दानवे विरुद्ध पक्षनेते विधान परिषद ,प्रमोद येवले कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, माननीय श्री चंद्रकांत जी खैरे माजी खासदार औरंगाबाद ,माननीय संजयजी जाधव खासदार परभणी, माननीय श्री आमदार बबनरावजी लोणीकर, माननीय आमदार राजेश टोपे, माननीय आमदार कैलास गोरंट्याल, माननीय आमदार संतोषजी दानवे, माननीय आमदार राजेशजी राठोड, माननीय आमदार नारायणजी कुचे, माननीय आमदार सतीश चव्हाण, माननीय आमदार विक्रमजी काळे, माननीय जिल्हाधिकारी विजयजी राठोड जालना ,माननीय नगराध्यक्ष पांडुरंग कथले घनसांवगी व योगीराज कैलास महाराज हेमके यांची प्रमुख उपस्थिती आहे
दि 10 डिसेंबर रोजी ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन चे उद्घाटन सकाळी दहा वाजता माननीय बाबू बिराजदार मावळते संमेलना अध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
10 डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते पाच पर्यंत कथाकथन हा कार्यक्रम होत आहे या कथाकथनचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नागनाथ पाटील वसमतकर सहभाग शंकर विभुते नांदेड, विलास सिंधीकर जळकोट, बबन आव्हाड परभणी, अनिता येलमट्टी उदगीर, सत्यशीला तोर जालना, अर्जुन डोईफोडे घनसांवगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबा कोटंबे परभणी ,आभार डॉक्टर सुभाष जाधव
परिसंवाद1
मध्ये विषय नवलेखकांचे लेखन समाज माध्यमाच्या आवर्तनास अडकले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष छाया माझे नाव औरंगाबाद सहभाग संभाजी खराट कोल्हापुर, अंजली कुलकर्णी पुणे, शैलजा वाडेकर नांदेड, श्रीराम गव्हाणे नांदेड, भगवान काळे परभणी ,अशोक नार नवरे औराद शहाजणी सूत्रसंचालन माननीय डॉक्टर जयदार्थ जाधव लातूर ,
परिसवाद दोन
विषय मी का लिहितो लिहिते
अध्यक्ष जगदीश कदम नांदेड ,सहभाग दीपाताई क्षीरसागर बीड ,उषा लिखनाळकर नांदेड, विजय जाधव अंबड, संग्राम पाटील किल्लारी, आशाराम लोमटे परभणी, संदीप जगदाळे पैठण, रमेश रावळकर औरंगाबाद, संचित सूत्रसंचालन रामेश्वर त्रिमुखे
संवाद तीन
कृषी जीवनातील प्रक्षोप आणि मराठी लेखन
अध्यक्ष फ म शहाजिंदे लातूर ,सहभाग सुषमा अंधारे उस्मानाबाद, लक्ष्मणरावजी वडले घनसांवगी ,निशिकांत भालेराव नाशिक, दमा मानेउदगीर ,राजकुमार तांगडे जाब समर्थ, राजकुमार मस्के उदगीर, सूत्रसंचालन ज्ञानदेव राऊत किल्लारी
परिसंवाद चार
विषय = संत साहित्याची उपेक्षा समाज चरित्रासाठी हानिकारक आहे अध्यक्ष बाबू शास्त्री करमाड,
सहभाग
भास्कर ब्रम्हनाथ परभणी, दुष्यंत कटारे लातूर ,लक्ष्मण बिराजदार उमरगा, बाबा राम विश्वकर्मा नांदेड,न ब कदम लातूर सखाराम कदम सेनगाव ,प्राचार्य आनंद भंडारी किनवट सूत्रसंचालन श्रीमती प्रज्ञा महाजन आंबेजोगाई,
दिनांक दहा डिसेंबर शनिवार रोजी पाच ते सात या वेळात आमचे कवी आमची कविता हा परिसंवाद पार पडत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम गायकवाड जालना सूत्रसंचालन राज रणधीर सुहास पोद्दार
दिनांक दहा डिसेंबर सात वाजल्यापासून पुढे कवी संमेलन अध्यक्ष जयराम खेडेकर जालना सूत्रसंचालन देविदास फुलारी नांदेड, समाधान इंगळे औरंगाबाद यासोबत दीडशेहून अधिक कवी या कवी संमेलनात सहभाग नोंदवणार आहेत या संमेलनाचा महाराष्ट्र व मराठवाड्यातील साहित्यप्रेमींनी आनंद घ्यावा व या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मा आमदार शिवाजीराव चोथे व संत रामदास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र परदेशी यांनी केले आहे