कुंभार पिंपळगावातून अपहरण केलेल्या तरुणाचा खून

कुंभार पिंपळगाव :
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुर्हाडीचा धाक दाखवून सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३, रा. राजाटाकळी) या तरुणाचे चार जणांनी चारचाकी वाहनामध्ये कोंबून अपहरण करण्यात आले होते.
दरम्यान, अपहरण झालेल्या सुरेश तुकाराम आर्दड याचा आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे अपहरण कर्त्यांनी सुरेश तुकाराम आर्दड यांचा खून करून त्याचे प्रेत दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आज रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश अर्दड यांचे चुलत भाऊ सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून हरी कल्याण तौर, सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (रा. राजा टाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (रा. कु. पिंपळगाव) आणि चारचाकी वाहनाचा चालक या चार जणांविरुद्ध अपहरण आणि शास्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.